सुंदर माझी शाळा
सुंदर माझी शाळा हो
सुंदर माझी शाळा ll धृ ll
शाळेभोवती सारी झाडं
रक्षण करण्या आम्ही पुढं
रोज आम्हाशी बोलतसे हा
भिंतीवरचा फळा ll १ ll
शिक्षण द्याया गुरुजन दक्ष
शाळेत असते आमुचे लक्ष
गावोगावच्या मुलांमुलींना
लावितसे ही लळा ll २ ll
स्वच्छ आमचा परिसर सारा
शुद्ध मोकळा इथला वारा
खेळ खेळण्या मैदानावर
होतो आम्ही गोळा ll ३ ll
ज्ञानप्रकाशे आम्ही उजळतो
शिस्तीचेही धडे गिरवतो
शाळे मधल्या संस्कारांनी
फुलतो जीवनमळा
सुंदर माझी शाळा ll ४ ll
— कवी -शं. ल. नाईक
— कवी -शं. ल. नाईक
चला गड्यांनो खेळूया !
आनंदाने नाचूया ! ll
बाग चिमुकली फुले उमलली
सुंदर फुलली
फुलांसारखे होऊया
फुलांभोवती नाचूया ll
फुलांभोवती भुंगे फिरती
गाणी गाती
तसेच आपण गाऊया
ताल धरोनी नाचूया ll
आभाळाचे तर्हेतर्हेचे
रंग मजेचे
चला चला रे पाहूया
आनंदाने नाचूया ll
—कवी-के. नारखेडे
बाप
Suresh - सुरेश शिरोडकर
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप ?
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती दुसर्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप !
— इंद्रजीत भालेराव
तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप
लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप ?
माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला रातदिस कामधंदा
कष्ट सारे त्याच्या हाती दुसर्याच्या हाती माप
बाप फोडतो लाकडं माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप !
— इंद्रजीत भालेराव
मातृभूमीस वंदन
वंदन तुज मायभूमि !हें अखेरचें !
न कळे तव दर्शन कधिं फिरुन व्हायचें ! ll धृ ll
विसकटली बसवावी फिरुन ती घडी
तव काजीं झिजवावी शक्य तों कुडी
आशेची फोल परि भ्रमुनि वावडी
देशोधडिं लागे ही आज बापुडी
आंचवलों जननीच्या सौख्यकारणा
आंचवलों तेंविं तुझ्या क्लेशवारणा
काय म्हणूं परिसमाप्ति ही तुला रुचे ?
वंदन तुज मायभूमि हें अखेरचें ll १ ll
यश मळलें, उजळाया फिरुन
त्याप्रती
तळमळलों धडपडलों निशिदिनीं
किती
परि भूवरि पाय कुणी
टेकुं ना दिला
काकांचे जेविं
थवे भ्रष्टल्या पिला
काडीचा आधारहि
मानिला महा
झाली परि फसवणूक नित्य दुस्सहा ll २ ll
सत्यम् शिवम् सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा ।।धृ ।। शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ।।1।। विद्याधन दे अाम्हांस एक छंद, एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा ।।2।। होऊ आम्ही नीतिमंत कलागुणी बुद्धिमंत कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा ।।3।। |
|
|
No comments:
Post a Comment